प्रस्तुतच्या अमृतानुभव या ग्रंथाच्या प्रकाशनाची जबाबदारी श्री. कुणाल मदन हजेरी, चेतक बुक्स, पुणे यांनी घेतली, हंसमंडळातर्फे त्यांचेही आभार. हंसराज स्वामींच्या मठातील तिन्ही समाध्यांची नित्यपूजा, नैवेद्य, दिवाबत्ती यासाठी प. पू. कै. डोंगरे महाराजांच्या ट्रस्टतर्फे एक लाख रुपयांची कायम स्वरुपाची ठेव ठेवण्यात आली आहे. तिच्या व्याजातून ही कामे व्यवस्थित चालू आहेत. हंस मंडळ ट्रस्टचे आभारी आहे. याखेरीज हंस मंडळाची आणखी बरीच कामे द्रव्याअभावी खोळंबलेली आहेत. त्यामुळे हंस मंडळाची झोळी सदैव उघडलेलीच आहे, एवढे नमूद करून आम्ही थांबतो.
- यशवंत रंगनाथराव महाजन
अध्यक्ष, हंस मंडळ, परंडा (जि. उस्मानाबाद),
परंडा ५१३५०२