श्री हंसराज स्वामी 

स्वामींचे जीवनचरित्र
आमच्याविषयी
श्री हंसराज स्वामी हे इ.स. १८०५ ते १८५५ या काळात होऊन गेलेले, मराठवाड्यातील शंकर वेदान्ताचे एक अधिकारी भाष्यकार म्हणून प्रसिद्धी पावलेले एक थोर संतकवी होते. त्यांचा जन्म परभणी येथे झाला होता आणि सन १८५५ मध्ये त्यांनी परंडा (जि. उस्मानाबाद) येथे समाधी घेतली. त्यांची समाधी परंडा (जि. उस्मानाबाद) येथे असून त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेदान्ताच्या प्रसारासाठी ग्रंथनिर्मिती करण्यात घालविले. अवघ्या पन्नास वर्षाच्या कालावधीत त्यांनी ४०,००० ओव्यांचा विस्तार असलेले एकूण चौदा ग्रंथ रचले.
पुढे वाचा
श्री हंसराज स्वामी परंड्यात ज्या मठात राहत होते व जिथे त्यांनी आपले प्राण अनंतात विलीन केले त्या मठाची देखभाल करणे, त्यांची पुस्तके छापून प्रसिद्ध करणे इ. कामे त्यांचे निकटचे शिष्य त्यांच्या समाधीनंतरच्या काळात यथाशक्ती करत राहिले. त्यांच्या प्रयत्नांनी हंसराज स्वामींचे वेदेश्वरी, वाक्यवृत्ती, सदाचार, वेदाज्ञा, अमृतानुभव टीका, वेद नावाचे काही अभंग व पदे आणि चूडालाख्यान हे ग्रंथ छापून निघाले हे मोठेच काम या काळात झाले. पण ही पिढी अस्तंगत होताच या कामांना खिळ बसली.
पुढे वाचा

ग्रंथसंग्रह

कथाकल्पलता

निरक्षर अबलेला वेदान्त समजून सांगण्यासाठी हा ग्रंथ रचिला गेला, यावरून तो किती सुगम असावा याची कल्पना येईल. प्रत्येक प्रकरणातील पूर्वरंगात अध्यात्म परिणामी....पुढे वाचा

श्री संकेत कुबडी

दासबोधाच्या प्रत्येक दशकाचा एकेका समासात सारांश देऊन त्यातील समासात २-४ ओव्यात सार सांगणारा हा ग्रंथ वैशिष्टयपूर्ण असून त्यातील मार्मिक विधाने हंसराज स्वामींच्या...पुढे वाचा

आगमसार

वेदान्त शास्त्राची प्रक्रिया सुलभतेने व थोडक्यात समजून घ्यावयाची असेल तर हा ग्रंथ अवश्य वाचावा. निरनिराळ्या पारिभाषिक संज्ञांचे स्पष्टीकरण आणि व्याख्या...पुढे वाचा

लघुवाक्यवृत्ती

श्रीमदादयशंकराचार्याच्या लघुवाक्यवृत्ती या अठरा श्लोकांच्या प्रकरणावर हंसराज स्वामींची ही ५६०० ऒव्यांची टीका आहे. उपनिषदांतील प्रसिद्ध महावाक्यांपैकी....पुढे वाचा

सटीक अमृतानुभव

हा ग्रंथ हंसराजस्वामींनी ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभव या ग्रंथावर केलेली समच्छंदी समसंख्य टीका आहे. मूळ अमृतानुभवाचे दहा अध्याय असून त्यात एकूण ८०५ ओव्या आहेत...पुढे वाचा

सदाचार

श्रीमदाद्य शंकराचार्यांच्या ' सदाचार ' याच नावाच्या लघु प्रकरणावर हंसराज स्वामींनी ही टीका लिहिली आहे. पांगरी येथील काशिनाथबाबा दीक्षित यांच्यासाठी त्यांनी...पुढे वाचा

Newsletter

Videos

Google Map

Copyrights @2021. All rights reserved | Website designed & developed by Ashtech

linkedin facebook pinterest youtube rss twitter instagram facebook-blank rss-blank linkedin-blank pinterest youtube twitter instagram